logo

शिरपूर शिवारात विज पडून एकाचा मृत्यू*

Shaikh Asif Shaikh Yusuf Buldana Maharashtra AIMA न्यूज

*शिरपूर शिवारात विज पडून एकाचा मृत्यू*

◼️जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, वादळ आणि वारा... मोठे नुकसान

बुलढाणा, 23 एप्रिल (AIMA न्यूज) : आज संध्याकाळच्या वेळी आलेल्या वादळी वाऱ्याने जिल्ह्यात काही ठिकाणी भयंकर नुकसान केले आहे. AIMA न्यूज ला प्राप्त माहितीनुसार शिरपूर (ता. बुलढाणा ) शिवारात विज पडून 70 वर्षीय बापूराव भीका हिवाळे यांचा मृत्यू झाला. चिखली शिवारातील मोजे सोनेवाडी या ठिकाणी असलेल्या त्यांच्या शेतीत ही दुर्दैवी घटना घडली. आमच्याकडे सदर मृतकाचा फोटो आहे परंतु या फोटोमुळे काही जणांचे चित्त विचलित होऊ शकत असल्यामुळे आम्ही तो या ठिकाणी देत नाही. AIMA न्यूजला आपल्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, पांगरी शिवारात सुद्धा अवकाळी पाऊस आणि वादळी वारा काही घरांची पडझड करून गेला. पांगरी येथील सुभाष पुंडलिक पवार यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान झाले. त्याची एक खोली आणि शौचालय पूर्णपणे कोसळले. काही लोकांच्या घरावरची तीन पतरे उडून गेली. जी बऱ्याच दूरपर्यंत उडून जमिनीवर पडली होती. दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून संबंधित यंत्रणेला प्राप्त झाले आहेत.

37
2267 views